जामतारा | इंटरनेटचा जसजसा वापर वाढत आहे. तसतसा स्मार्टफोनचा वापरही वाढताना दिसत आहे. हॅकर्स नवनव्या आयडिया शोधून फ्रॉड करत आहेत. त्यात आता नवीनच आयडिया शोधली आहे. ती आपल्या सर्वांसाठी धक्कादायक अशीच आहे. या माध्यमातून OTP शिवाय खात्यातून लाखो रुपये गायब झाल्याचा प्रकार घडला.
या सायबर स्कॅमच्या माध्यमातून दिल्लीच्या एका व्यक्तीच्या खात्यातून तब्बल 50 लाख रुपये काढण्यात आले आहे. त्यांच्या मोबाईलवर अनेक मिस्ड कॉल्स आले होते. फ्रॉड करणाऱ्यांनी OTP शिवाय अनेक व्यवहार केले होते. यामध्ये त्या व्यक्तीने सांगितले की, मी कोणताही OTP शेअर केला नाही. तरीदेखील माझी फसवणूक झाली.
विना OTP कसा झाला फ्रॉड?
या प्रकरणात स्कॅमर्सने सिम स्वॅप करून फसवणूक केली असावी, असा अंदाज आहे. RTGS ट्रान्सफर सुरु केल्यानंतर OTP साठी ब्लॅंक किंवा मिस्ड कॉल्स येत राहतात. तसेच स्कॅमरने OTP सिम स्वॅपच्या माध्यमातून मिळवला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सिम स्वॅप फ्रॉड आहे तरी काय?
सिम स्वॅप प्रकारात स्कॅमर्स टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन बायपाय करून संबंधिताच्या मोबाईल नंबर एक्सेस सहज मिळू शकतो. यातून संबंधित व्यक्तीला येणारे फोन, मेसेज स्कॅमर्सलाही मिळू शकतात.