मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच आता भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
‘सिल्व्हर ओक’ या शरद पवार यांच्या निवासस्थान फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर आता प्रसाद लाड यांचे पुतणे वरुण लाड यांच्या फोनवर प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
वरुण लाड यांना फोन करून अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली. आता या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.