नवी दिल्ली | सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात WhatsApp युजरची संख्या मोठी आहे. त्यामुळे युजर्ससाठी कंपनीकडून अनेक फिचर्स आणले जात आहेत. त्यात WhatsApp चा मेसेज चुकून डिलिट झाला तर आपल्याला प्रश्न पडतो की मेसेज परत मिळवायचा कसा? पण आता डिलिट झालेला मेसेज पुन्हा पाहता येणार आहे.
WhatsApp वरील मेसेज डिलिट करताना Delete for Me आणि Delete for Everyone हा पर्याय दिला जातो. जेव्हा Delete for Me हा पर्याय निवडला तर फक्त आपलाच मेसेज डिलिट होतो. पण समोरच्या व्यक्तीला तो मेसेज तसाच दिसतो. मात्र, आता आपल्याला तोच मेसेज पुन्हा आणता येणार आहे.
असे आहे नवे फिचर
युजर्सला डिलिट झालेले WhatsApp मेसेज पुन्हा आणण्यासाठी Undo पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर चुकून डिलिट झालेला मेसेज पुन्हा येईल. WhatsApp ने Accidental Delete असे या फिचरचे नाव दिले आहे. युजरला कोणताही मेसेज डिलिट करण्यासाठी Undo करणे गरजेचे आहे. मात्र, हा पर्याय फक्त पाच सेकंदासाठी मिळणार आहे.