नागपूर | ”मी वरच्या सभागृहात उत्तर दिलंय, येथेही देतो. आम्ही भूखंडाचे श्रीखंड खाणारे नाहीत. ८३ कोटी वगैरे आस्मानी आकडे पूर्णपणे चुकीचे आहेत”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना टोला लगावला.
छगन भुजबळ यांनी विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ”छगन भुजबळांनी वरच्या सभागृहाचा उल्लेख केला, तिथे पूर्णपणे मी खुलासा केला आहे. अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांवर चुकीचे आरोप लावणे योग्य नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे”.
यानिमित्ताने भुजबळसाहेब मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, 83 कोटी वगैरे आस्मानी आकडे पूर्णपणे चुकीचे आहेत. मी वरच्या सभागृहात उत्तर दिलं आहे, येथेही देतो. आम्ही भूखंडाचे श्रीखंड खाणारे नाहीत, असेही ते म्हणाले.