बीड | मी संघर्ष कन्या आहे, माझा संघर्षाचा वारसा आहे, मी संघर्ष करणार. जोडे उचरणाऱ्यांचं कधीच इतिहासात नाव झालं आहे. त्यामुळे संघर्ष हा प्रत्येकाला आहे. गोपीनाथ मुंडेंची मी लेक आहे. त्यामुळे संघर्ष मला नवीन नाही. संघर्ष मी नाकारणार नाही. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात संघर्षाचा उल्लेख केला मात्र त्यांचा रोख कुणावर? हा प्रश्न अता उपस्थित होत आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यात बोलत होत्या. खासदार प्रीतम मुंडे यांनी रॅलीला सुरुवात केली आहे. बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन गोपीनाथगड ते भगवानभक्ती रॅलीला सुरुवात केली.