औरंगाबाद | दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. कोण जास्त गर्दी जमवतो, यावरून दोन्ही गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. पण, अशातच औरंगाबाद ते मुंबई विमानात वेगळेच चित्र पाहण्यास मिळाले. शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे हे एकाच विमानाने मुंबईला आले.
आज मुंबईमध्ये शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईला पोहचले आहे. आज सकाळी अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे एकाच विमानाने मुंबईकडे रवाना झाले. विमानात दोघांच्या सीट आजूबाजूला होत्या. त्यामुळे दोघेही हास्य विनोद करीत असतानाची क्लिप व्हायरल झाली आहे.