पुणे | दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे कोरोनाच्या आधी आणि कोरोना नंतरही 35 वर्षांपासून सतत गोरगरिबांचा विचार करीत उपक्रम करीत आहे. सामान्य माणसाची दिवाळी गोड करणारा रास्त दरात लाडू-चिवडा उपक्रम ते राबवित असून त्याची ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद घेण्यात आली. मात्र, पुणेकरांच्या मनाचे सर्टिफिकेट दि पूना मर्चंट चेंबरने मिळवले असून ते सर्वाधिक महत्वाचे असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.
नाजुश्री सभागृह येथे लाडू-चिवडा विक्री उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, भाजप पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, जय जिनेंद्र प्रतिष्ठानचे अचल जैन, पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, आमदार सुनील कांबळे, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, मुख्य सल्लागार सिस्टिम महारेल प्रदीपकुमार श्रीवास्तव, माजी अध्यक्ष राजेश शहा, वालचंद संचेती, राजेश फुलफगर, राजेंद्र गुगळे, दीपक बोरा, प्रविण चोरबेले, चेंबरचे उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, सहसचिव ईश्वर नहार, पप्पू महाराज, अरविंद परमार, सुनील बोरा, अक्षय गदिया, डॉ. कल्याण गंगवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
जयजिनेंद्र प्रतिष्ठान, मार्केट यार्ड येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. व्यापार करीत असतानाच चेंबरच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. नागरीकांच्या मागणीनुसार या वर्ष प्रथमच अर्धा किलोच्या पकिंगमध्ये लाडू व चिवडा उपलब्ध केलेला आहे. यंदा लाडू व चिवड्याचा १ किलोचा भाव फक्त १५०/- रुपये व अर्धा किलोचा भाव फक्त ८०/- रुपये दराने आम्ही उपलब्ध करून देत आहोत, असे राजेंद्र बाठिया यांनी सांगितले.
वेळी १५ सामाजिक संस्थांना तसेच आम्ही पुणेकर या संस्थेस सीमेवरील जवानांसाठी लाडू चिवड्याचे मोफत वितरण करण्यात आले.
रास्त दरातील लाडू-चिवडा विक्री केंद्र पुढीलप्रमाणे –
चिवड्याचे वितरण दि पूना मर्चंटस् चेंबरचे मार्केट यार्डातील व्यापार-भवन, ग्राहक पेठ (एस.पी. कॉलेज समोर, टिळक रोड ), आझाद मित्र मंडळ (पुष्पमंगल कार्यालय, बिबवेवाडी), शंकरशेठ रोडवरील शेष केशर बंगला (ओसवाल बंधु समाज कार्यालय समोर), जयश्री ग्रोसरी अँड ड्रायफ्रूटस प्रा. लि. (कोथरुड), भगत ट्रेडर्स (सिंहगड रोड), आगरवाल सेल्स कॉर्पोरेशन (कर्वेनगर), जगदीश ट्रेडिंग कंपनी (हडपसर), कुवाड कोठारी सप्लाय कंपनी (कर्वेनगर), व्ही एन. एंटरप्राईजेस (पद्मावती मंदिरासमोर), अर्बन बाझार (सिंहगड रोड), पवन ट्रेडर्स (चंदननगर), श्रीराम जनरल स्टोअर्स (चिंचवड), निखिल ग्रोसरी वर्ल्ड (आळंदी), विजय ट्रेडिंग कंपनी (कोंढवा), श्री वर्धमान जैन श्रावक संघ (आकुर्डी), श्री साई समाजिक सेवा (कसबा पेठ), श्री लक्ष्मी ब्यूटी चॉईस लेडीज शॉपी (खडकी), सह्याद्री सेवा प्रतिष्ठान (पर्वती), दीपिका दीपक नेवे (खराडी).