पुणे | कोंढव्यातील अर्चना पॅरेडाईजजवळील नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती कोंढवा बुदुक्र अग्निशमन विभागास सकाळी साडेआठच्या सुमारास देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याबाहेर हा मृतदेह काढून पोलिसांच्या ताब्यात दिला.
अर्चना पॅरेडाईजच्या जवळ असलेल्या नाल्यात संबंधित व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने येथील नागरिकांनी अग्निशमन विभागाला कळवले. त्यानंतर अग्निशनमन विभागाच्या जवानाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरु केले. जवानांनी हा मृतदेह पाण्याबाहेर काढला. या बचावकार्यात कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्राचे फायरमन तेजस खरीवले, अभिजित थळकर, वाहनचालक योगेश जगतापआणि मदतनीस अक्षय चव्हाण, अभिषेक कसबे, सतीश अरगडे यानी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.