मुंबई : दिवाळीच्या सणामध्ये नागरिकांचे पाय आपोआपचं मिठाईच्या दुकानाकडे वळतात. दिवाळीमध्ये सर्वाधिक पसंती मिठाईला दिली जाते. परंतु तोंड गोड करणारी मिठाई आता २० ते ३० टक्क्यांनी महागली आहे. तरीदेखील दिवाळीच्या सणात मिठाई खरेदी करण्यावर नागरिकांचा अधिक कल दिसून येत आहे.
यंदा सुका मेवा त्यासोबतच विविध प्रकारची मिठाई आणि आकर्षक अशा मिठाईचे बॉक्स लोकांच्या पसंतीचे कारण बनले आहे. त्यामुळे सामान्यांची दिवाळी नक्कीच गोड होणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसात खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली. तसेच दुधाच्या किमतींमध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे हे दर वाढले असल्याची माहिती मिठाई विक्रेत्यांनी दिली.