पुणे | महापुरुषांबाबत राजकारण्यांकडून केल्या जाणाऱ्या विधानावर संताप व्यक्त केला जात आहे. त्यात ‘पुणे बंद’ची हाक देण्यात आली आहे. पुण्यातील जवळपास सर्वच दुकाने बंद करण्यात आली होती. त्यावर आता ऍड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या अटकेची मागणी केली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याच्या मागणीने जोर धरला. त्यानंतर आज पुण्यात बंद पाळण्यात आला आहे. या बंदला विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले हेदेखील सहभागी झाले होते. त्यावर ऍड. सदावर्ते यांनी उदयनराजे यांच्या अटकेची मागणी केली.
ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा सांगितलं आहे की बंद बेकायदेशीर आहेत, असं असताना आज हा बंद पुकारण्यात आलाय. कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम सुरू आहे. हा बंद बेकायदेशीर आहे. त्यामुळे उदयनराजेंना अटक करण्यात यावी.