पुणे | पुण्यात घर घेण्याचे स्वप्न अनेकांचे असते मात्र मोठमोठ्या इमारतींमुळे आपल्याला हवं तसं घर घेण आताच्या काळात अशक्य आहे. नाईकनवरे डेव्हलपर्सच्या वतीने पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी नाईकनवरे डेव्हलपर्सने पुणे परिसरात आवासा प्रकल्प लाँच केला आहे.
तळेगावमध्ये पहिल्या प्रीमियम प्लॉटेड असलेला आवासा मेडोज या प्रकल्पातील ६२ सर्व्हिस केलेले NA प्लॉट त्यांनी उपलब्ध केले आहे. यामध्ये लीड कॅप्चरपासून बुकिंग आणि त्यानंतर ऑनलाइन – नोंदणीपर्यंत सर्वसमावेशक बाबी असणार आहे. प्रत्येकी 1848 चौ. फूट ते 2846 चौ. फूट आकाराच्या या प्लॉटची किंमत ६० लाखांपासून सुरु आहे.
नाईकनवरे डेव्हलपर्सच्या बिझनेस प्रोसेसेसचे प्रमुख आनंद नाईकनवरे म्हणाले, मोठ्या जागांची वाढती मागणी त्याचबरोबर कोविडमुळे निर्माण झालेली जीवनशैली या सर्व गोष्टी प्लॉटिंगच्या विक्रीत जलद गतीने वाढ होण्यास हातभार लावत आहेत. त्यामुळे खरेदी करणार्यांसाठी जेवढ्या सुविधा आम्हाला उपलब्ध करून देता येईल तेवढ्या सोयीसुविधा आम्ही या प्लॉटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, “आवासा मेडोज” अंतर्गत पहिला प्रकल्प तळेगावच्या वडगाव मावळ परिसरात आहे. तसेच नागरिकांना प्लॉट खरेदी आणि नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया घरबसल्या करणे सहज शक्य होणार आहे.