राजापूर | बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातलं आंदोलन आता तीव्र होताना दिसत आहे. या प्रकल्पाच्या पहिला टप्प्यातील माती सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. यावेळी भू-सर्वेक्षण केलं जात असताना आंदोलकांनी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
आज पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी महिलांना देखील मारहाण झाल्याचा दावा काही आंदोलकांनी केला आहे. पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न होत असताना देखील आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम होते.
दरम्यान, बारसुतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. या कालावधीमध्ये सरकारसोबत चर्चा होणार असल्याच देखील आंदोलकांनी म्हटल आहे. मात्र तीन दिवसांमध्ये माती सर्वेक्षण थांबलं नाही तर पुन्हा आंदोलन सुरु करु, असा इशारा देण्यात आलेला आहे. आंदोलक काशिनाथ गोरले यांनी याबाबत माहिती दिली.