मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा मेळावा मुंबईत पार पडला. यावेळी मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी कधी कधी ५० टक्के काम होतात तर कधी पूर्ण देखील होत नाही. आपण लवकरच सत्तेत असू तसेच आपली १०० टक्के कामे पूर्ण होतील असं आश्वासन यावेळी अमित ठाकरे यांनी दिले आहे. आपण इथे फक्त कामगार सेनेची ताकद बघायला आलोय. हे सगळे तुमचे कष्ट आहेत असेदेखील अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
या मेळाव्यात शर्मिला ठाकरे यादेखील उपस्थित होत्या. त्यांनी देखील आपल्या मनोगतात अमित राजकारणात आल्यापासून मी आळशी झाले आहे. मी इथे येणार नव्हते पण फक्त तुमच्यासाठी मी इथे आलेय. कामगार कपात सगळीकडे सुरु आहे. त्यात आपण कामगारांना न्याय देत आहात. तुमच्या कामाचा कौतुक करण्यासाठी मी इथे आले आहे. पुढच्या वर्षी मी येणार नाही कारण पुढच्या वर्षी माईक हा अमितच्या हातात गेला पाहिजे. बाकीच्यांची टीम ६० प्लस आहे. आपली टीम तरुण आहे. कठीण काळात तुम्ही कामगारांना न्याय मिळवून देत आहात. सगळ्यांनी चांगलं काम केलंय म्हणून एवढे युनिट वाढले आहेत असं मत व्यक्त केले आहे.
तसेच या कामगार मेळाव्यात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सध्या राजकारणात कुस्त्या सुरु असल्याच म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंची कुस्ती एकनाथ शिंदें आणि फडणवीसांसोबत सुरु आहे. संजय राऊत विरुद्ध नितेश राणे, अजित पवार यांची घरातच कुस्ती सुरु आहे. बारसूमध्ये पण कुस्ती सुरु आहे. कोण कोणाच्या समर्थनार्थ आहे कोण विरोधात हेच कळत नाही. राज ठाकरे यांची या कुस्तीत एन्ट्री होईल. असे टोलेबाजी त्यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान, मनसेच्या कामगार मेळाव्याला अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण, मनसे प्रवक्ते गजानन काळे उपस्थित होते. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनुपस्थितीत होते.