पुणे | काल(गुरुवार) रोजी राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाच्या पारा देखील ४० अंश सेल्सीअसपेक्षा अधिक आहे. बदलत्या हवामानाने नागरिक देखील त्रस्त झाले आहेत. दररोज सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास पावसाला सुरूवात होते.
काल पुण्यात देखील सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक भागात पाऊस पडला. या पावसामुळे भूमकर चौकातील भुयारी पुलात तब्बल गुडघाभर पाणी साचले होते. वाहनांच्या लांब रांगा लागल्याने स्थानिक रहिवाशांना मोठ्या मनःस्थापाला सामोरे जावे लागले. अनेक वाहने या पाण्यात बंद पडली होती.
दरम्यान, सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता त्यानंतर काळे ढग भरून आल्याने दुपारनंतर पावसाने सुमारे एक तास हजेरी लावल्याने गटारी तुडुंब भरून मुख्य मार्गांवर पाणी साठल्याचे जागोजागी दिसून आले. अचानकपणे पावसाने लावलेली हजेरीमुळे बाजारात दाखल झालेल्या शेतकरी बांधवांचे देखील हाल झाल्याचे पाहायला मिळाले. तर परभणी, लातूर, हिंगोलीला ऑरेंज अलर्ज जारी करण्यात आला आहे.