पुणे | येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकातील माँ आशापुरा माता मंदिरात सायंकाळी ७ वाजता श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रसिद्ध कलाकार संदीप पंचवाटकर हे श्रीराम यांच्यावर आधारित असलेल्या गाण्यांची सुरेल मैफल सादर करणार आहेत…त्याबरोबरच भजन संध्या, भव्य दिपोत्सव, फायर शो असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
या महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी केले आहे.