मुंबई | राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आरोग्य विभागात 10 हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो तरुणांना होणार आहे. फेब्रुवारी, मार्चदरम्यान परीक्षा घेऊन जागा भरण्यात येणार आहेत.
कोरोनानंतर गेल्या साडे तीन वर्षांपासून सरकारी नोकर भरती खोळंबली होती. त्यामुळे अनेक रिक्त जागा भरल्या जात नव्हत्या. पण आता शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा भरती प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील आरोग्य विभागात 10 हजार जागा भरण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो तरुणांना फायदा होणार आहे.
कसं आहे भरतीचं वेळापत्रक?
- 1 जानेवारी ते 7 जानेवारी – भरतीची जाहिरात प्रसिद्ध
- 25 जानेवारी ते 30 जानेवारी – उमेदवारांच्या अर्जाची छाननी
- 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी – पात्र उमेदवारांची यादी जाहीर
- 25 मार्च आणि 26 मार्च – विविध पदांसाठी भरती परीक्षा
- 27 मार्च ते 27 एप्रिल – उमेदवारांची निवड