पुणे | ”कोरोनानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर अनेकांकडून विशेष भर दिला जात आहे. हेच लक्षात घेता रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या ‘बेसिलिया ऑरगॅनिक्स’च्या गुड-मॉमचे भरड धान्य फायद्याचे ठरत आहे. याचा भरड धान्याचा वापर आपण केला पाहिजे. या भरड धान्याला प्रचंड मागणी आहे. हे भरड धान्य शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न देऊ शकेल”, असे मत ‘बेसिलिया ऑरगॅनिक्स’च्या शर्मिला ओसवाल यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत शर्मिला ओसवाल बोलत होत्या. यावेळी त्यांचे पुत्र शुभम ओसवाल हेदेखील उपस्थित होते. या सर्व उत्पादनाची माहिती देताना त्या म्हणाल्या, ”कोरोनानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढविणे किती गरजेचे आहे, याचे महत्त्व समजले आहे. त्यानुसार ‘बेसिलिया ऑरगॅनिक्स’च्या गुड-मॉमचे भरड धान्य उपयोगी ठरत आहे. हे भरड धान्य शेतकऱ्यांसाठी पूरक असे हे धान्य असून, या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल. हा उपक्रम जागतिक स्तरावर राबवण्यात आला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गल्फ, कतार, ओमान यांसारख्या देशात हे उत्पादन आवडले आहे. या सर्वाची दखल घेत केंद्र सरकारकडून ‘बेस्ट स्टार्टअप अॅवॉर्ड’ देण्यात आला आहे”.
‘बेसिलिया ऑरगॅनिक्स’च्या गुड-मॉमच्या भरड धान्याच्या वापरामुळे मधुमेह, कर्करोग यांसारखे आजार बळावणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आमच्या या भरड धान्याच्या प्रभावी वापरामुळे आम्हाला जर्काता या देशाचे निमंत्रण मिळाले आहे. हे भरड धान्य जास्त खर्चिक नसून, परवडणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सरकारने लक्ष द्यावे
‘बेसिलिया ऑरगॅनिक्स’च्या गुड-मॉमच्या भरड धान्याच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लक्ष द्यावे. आपल्या शेतकऱ्यांना जागतिक पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच या भरड धान्य उत्पादनाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर ठसा उमटवणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांकडून कौतुक
शर्मिला ओसवाल यांच्या भरड धान्याच्या उत्पादनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. त्यांनी 2023 या आंतरराष्ट्रीय पोषक अन्नधान्य वर्षानिमित्त जागतिक स्तरावर पोषक अन्नधान्याच्या प्रचारासाठी या स्टार्टअपची निवडही केली आहे.