मुंबई | ‘आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप करताय, बदनामी करताय. एक दिवस आमदारांचा संयम सुटेल. कायद्यात माफीचा साक्षीदार असतो. मग कळेल कुठे कुठे खोके गेले, अशा शब्दांत शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी संताप व्यक्त केला.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुलढाण्यातील सभेत पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांवर खोके घेतल्याचा आरोप करत निशाणा साधला. त्यावर केसरकर चांगलेच संतापले आहेत. गुवाहाटीवरून उद्धव ठाकरे यांची सभा त्यांनी पाहिल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना ते म्हणाले, ”आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप करताय, बदनामी करताय. एकदिवशी आमदारांचा संयम सुटेल. कायद्यात माफीचा साक्षीदार असतो. मग कळेल कुठे कुठे खोके गेले. फ्रीजचा बॉक्स, कार्टून भरून भरून कुठे काय गेले हे बाहेर पडेल”.
आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून…
ज्या अयोध्येला तुम्ही जाता, ती रथयात्रा कोणी अडवली ती माहिती नाही का? ज्याने अडवली त्याच्या पायाशी जाऊन लोटांगण घालता. बदनामी सहन करण्याची मर्यादा असते. आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून आम्ही अजून बोलत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.