मुंबई | सतत काही ना काही वक्तव्य करून चर्चेत राहणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून मुक्त करण्याबाबतचे वृत्त येत आहे. त्यावर आता खुद्द राजभवनकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राजभवनकडून देण्यात आलेल्या पत्रात याबाबतच्या वृत्ताचे खंडन केले.
राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले यांच्यासह अनेक नेतेमंडळींकडून राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेतला गेला. कोश्यारींना महाराष्ट्र राज्यपालपदावरून दूर करण्याची मागणी केली जात आहे. त्यातच कोश्यारींनी राजीनामा दिल्याचेही म्हटले जात होते.
दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडीनंतर राज्यपाल कोश्यारी हे महाराष्ट्रात राहणार की जाणार यावर राजभवनने सांगितले आहे. राजीनामा देण्याची इच्छा राज्यपालांची नाही, असे राजभवनातून आलेल्या पत्रात म्हटले आहे.