मुंबई | महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात गेल्या काही दिवसांपासून सीमाप्रश्नावरून वादंग निर्माण झाला आहे. त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना राज्यात बंदी घातली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी त्यांचा नियोजित बेळगाव दौरा रद्द केल्याच्या चर्चा असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक फेसबुक पोस्ट केली.
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शरद पवारांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण करून दिली आहे. कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरु झाला आहे. असे असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला. ही बातमी वाचली आणि मला आदरणीय पवार साहेबांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली.
साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही. खुद्द एस. एम. जोशी देखील साहेबांच्या पाठीवर उमटलेले वळ पाहून हळहळले होते. तो काळच तसा होता, असे म्हटले आहे.