नागपूर | ”ग्रामपंचायतींचा निकाल आमच्या बाजूने लागला. यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे अभिनंदन करतो. आज महाराष्ट्राच्या जनतेने सांगितलं की, जनता सरकारच्या पाठिशी आहे”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्याचे निकाल आता समोर येत आहेत. यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील बाळासाहेबांच्या शिवसेनेला मोठा विजय मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ”आजचा निकाल आमच्या बाजूने लागला आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन करतो”.
तसेच जी लोकं आमच्या सरकारला नावं ठेवत होती, स्वतः अपात्र असताना आमच्या सरकारला अपात्र म्हणत होते, त्यांना न्यायालयाने सांगितलेच, पण आज महाराष्ट्राच्या जनतेने सांगितलं की, जनता सरकारच्या पाठिशी आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.