मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना हे टार्गेट दिलं होतं, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devenra Fadnavis) यांनी केला. मी राजकीय वैर ठेवत नाही. आमचं सरकारही सुडबुद्धीने वागणार नाही, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ”मी राजकीय वैर ठेवत नाही. आमचं सरकारही सुडबुद्धीने वागणार नाही. पण या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या आणि मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना टार्गेट देण्यात आलं होतं”.
दरम्यान, मी असं काहीच केलं नव्हतं, ज्यामुळे ते मला तुरुंगात टाकू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. पण कोणत्याही परिस्थितीत मला अडकवा आणि तुरुंगात टाका, असे आदेश ठाकरे सरकारचे होते. हेदेखील सत्य आहे, असेही ते म्हणाले.