पुणे | यंदाच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेचे हॉलतिकीट दि. ६ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजल्यापासून ऑनलाईन म्हणजेच बोर्डाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटाची प्रत देताना कुठलेही शुल्क आकारु नये, तसेच प्रत काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी, अशा सूचना बोर्डाने केल्या आहेत.
दरम्यान, हॉल तिकीटामध्ये विषय आणि माध्यम यामध्ये बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यायच्या आहेत. हॉल तिकीटामध्ये फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ या संदर्भात दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायचे आहे. प्रवेश पत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास, संबंधित माध्यमिक शाळांनी त्याची पुन्हा प्रिंट काढून त्यात लाल शाईने द्वितीय प्रत म्हणजेच डुप्लिकेट असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायचे आहे. अशादेखील सूचना देण्यात आल्या आहेत.