मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राजभवनात निरोप देण्यात आला.
यावेळी राजशिष्टाचार विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर तसेच राजभवनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांना स्वतः उपस्थित राहिलेले राज्यपाल अशीही त्यांची ओळख महाराष्ट्राला कायमच राहील. त्यांनी राज्य सरकारला केलेले सहकार्य आणि महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान विसरता येणार नाही तसेच राज्यपाल कोश्यारी यांच्या कार्यकाळात राजभवनात अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. तसेच राजभवनातील विस्तारित इमारतीचे बांधकाम करण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
त्याचबरोबर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृष्णाची मूर्ती देऊन केलं राज्यपालांचे स्वागत केले. आणि पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची प्रतिमा भेट म्हणून देऊन त्यांचे शासनाच्या वतीने आभार मानले.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी हे आपल्या काही वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहे. विरोधकांनी देखील त्यांच्यावर पदमुक्त करण्याची सरकारला मागणी केली होती. राज्यात त्यावर अनेक आंदोलने देखील करण्यात आली. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना निरोप दिला. तर काल राजभवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून राज्यपालांना निरोप देण्यात आला.