पुणे | शिक्षणाबरोबरच विद्यार्थी तंदुरुस्त राहावेत आणि त्यासाठी त्यांनी खेळणं आवश्यक असतं. याच उद्देशानं पुण्यातील बावधन येथील प्रसिद्ध सूर्यदत्त कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीनं आंतर शालेय व्हॉलीबॉलच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ. संजय बी चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या आंतर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत टी.वाय बीबीए, पीजीडीएम एमबीए, एससीएमआयआरटी टीम ए, एससीएमआयआरटी टीम बी, एससीएमआयआरटी टीम सी, एफवाय सीडीएस , एससीएमआयआरटी बीबीए, पीजीडीएम एमबीए, एससीएमआयआरटी टीम एक्स – स्पार्क्स, 12वी वाणिज्य एचएससी हे संघ सहभागी झाले होते.
आंतर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत अखेरचा सामना 12वी वाणिज्य एचएससी विरुध्द एससीएमआयआरटी गोकुळधाम या संघात पार पडला. 12वी वाणिज्य एचएससी या संघाने प्रतिस्पर्धी असलेल्या एससीएमआयआरटी गोकुळधाम या संघावर मात करून विजय मिळवला.
12वी वाणिज्य एचएससी या विजेत्या संघाला सुवर्णपदक, एससीएमआयआरटी गोकुळधाम या उपविजयी संघाला रजत पदक आणि एससीएमआयआरटी स्पार्टन्स या तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या संघास कांस्य पदक देण्यात आले.
यावेळी संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट ऑफिसर सिद्धांत संजय चोरडिया, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या क्रीडा संचालक दिलप्रीत कौर, क्रीडा शिक्षक विजय पोतेकर, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या किरण राव, पीआरओ प्रशांत पितळीया यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.