सेलिब्रिटी लाईव्ह बँड आणि विद्यार्थ्यांचा जल्लोष
पुणे | कोजागिरी पोर्णिमेनिमित्त पुण्यातील बावधन येथील सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटमध्ये सुर्यदत्त कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी चोरडिया आणि सुर्यदत्त कॉलेजच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली रास दांडियाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असे सगळेच पारंपरिक वेशभूषेमध्ये एकत्र येत रास दांडियाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी सेलिब्रिटी लाईव्ह बँड आणि सेलिब्रिटी डान्स ग्रुपला कॉलेजच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या गाण्यावर थिरकत विद्यार्थ्यांनी ठेका धरला.
काही विद्यार्थी गरबा खेळत होते, काही नृत्य करत होते, तर काही दांडिया खेळण्याचा आनंद घेत होते. अशा संगीतमय कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनी देखील मजा केली. यावेळी सुर्यदत्त कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी चोरडिया, सुर्यदत्त कॉलेजच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सुर्यदत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वंदना पांडे, सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटचे पीआरओ प्रशांत पितळीया, शिक्षक अंशिका जोशी, तेजल निकम, आदी शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटमध्ये शैक्षणिक अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी असे विविध प्रकारच्या कार्यक्रमांच आयोजन करण्यात येतं.
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सूर्यदत्त कॉलेजमध्ये अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवले जातात. याठिकाणी भारतीय संस्कृतीतील सण-उत्सव देखील तेवढ्याच जल्लोषात साजरे केले जातात.
– प्रा. वंदना पांडे, प्राचार्या, सुर्यदत्त कनिष्ठ महाविद्यालय
या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक अशा सर्वांनीच या कार्यक्रमाचा आनंद घेतला. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील नामवंत लाईव्ह बँडला आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून या दिवसाचा आनंद घेतला.
– प्रशांत पितळीया, पीआरओ, सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट