पुणे | पुण्यातील प्रसिद्ध सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या बावधन कॅम्पसमध्ये सावली संस्थेतील मतिमंद व बहुविकलांग मुलांनी तयार केलेल्या वस्तु विक्रीस ठेवण्यात आल्या. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी तसेच सूर्यदत्त सोशो कनेक्टच्या माध्यमातून राबविण्यात आला.
सावली संस्थेच्या मतिमंद व बहुविकलांग मुलांना आर्थिक हातभार मिळावा या उद्देशानं या मुलांनी स्वतः तयार केलेल्या पणती, आकाश कंदील अशा विविध प्रकारच्या दिवाळीच्या वस्तू विक्रीकरिता ठेवण्यात आल्या होत्या. सूर्यदत्तच्या वतीनं या सावली संस्थेच्या मुलांना त्यासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ. संजय बी चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
महाविद्यालयात हा उपक्रम राबवण्यात आला ज्यामुळे या मतिमंद व बहुविकलांग मुलांना आर्थिक हातभार मिळू शकतो. अतिशय उत्तम प्रकारचे स्वतः तयार केलेले आकाशकंदील या मुलांनी या स्टॉलवर विक्रीकरिता ठेवण्यात आले आहे. कॉलेजच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम नेहमीच राबवण्यात येतात.
- डॉ. मिथिलेश विश्वकर्मा, प्राचार्य, सूर्यदत्त लॉ कॉलेज
सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ. संजय बी चोरडिया यांच्या सहकार्याने आम्हाला या महाविद्यालयाच्या परिसरात हा स्टॉल उपलब्ध करून दिला आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंना महाविद्यालयातील शिक्षकांसह विद्यार्थ्यांचादेखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
- प्रदीप जोशी, विश्वस्त, सावली संस्था