पुणे | पुण्यातील प्रसिद्ध सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सूर्यदत्त इन्स्टिटयूट ऑफ हेल्थ सायन्स कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या वतीने व सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजच्या प्रांगणात सूर्यदत्त सूर्यभारत महोत्सव २०२३-२४ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवामध्ये शुक्रवारी आरोग्याशी निगडीत विविध शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं.
या सूर्यदत्त सूर्यभारत महोत्सवाच्या कार्यक्रमात भारत विकास परिषद-विकलांग केंद्र यांच्या सहकार्याने दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर हात, पाय व कॅलिपर्स वाटप शिबीर आयोजित करण्यात आलं यामध्ये जवळपास 18 दिव्यांग नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. याचबरोबर मोफत डोळ्यांची तपासणी, मोफत मोतीबिंदू, काचबिंदू, पडद्याच्या शस्त्रक्रिया, हृदय ईसीजी तपासणी, बायपास शस्त्रक्रिया, डिवाईस कोल्जर, पेस मेकर, वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया अशी विविध शिबीरं राबवण्यात आली. याशिवाय साईधाम कॅन्सर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने कर्करोग जागरूकता, प्रतिबंध आणि तपासणी शिबिरदेखील राबवण्यात आलं.
यावेळी स्त्रीरोग ऑन्कोसर्जन डॉ. स्वप्नील माने यांना सूर्यदत्त सूर्यभारत सन्मान देऊन गौरवण्यात आलं…तर स्त्रीरोग तज्ञ डॉ सायली रुलत, को-ओर्डीनेटर मनोज केदारी, लॅब टेक्निशियन स्वाती वागळे आणि सूरज विटनोर यांनाही सन्मानित करण्यात आले.
तसेच सूर्यदत्त इन्स्टिटयूटचे संस्थापक अध्यक्ष संजय बी चोरडिया यांची साईधाम कॅन्सर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे ट्रस्टी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सूर्यदत्त सूर्यभारत महोत्सवात स्त्रीरोग ऑन्कोसर्जन डॉ. स्वप्नील माने यांनी याबाबत घोषणा केली.
यावेळी सूर्यदत्त इन्स्टिटयूट ऑफ हेल्थ सायन्स कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्या यांनी बोलताना, सूर्यदत्तच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी तसेच परिसरातील नागरिकांसाठी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या तीन वर्षात कृत्रिम अवयवाचा ६ वा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये कॉलेजच्या रजत महोत्सवानिमित्त असे विविध कार्यक्रम आयोजत करण्यात येतात असे सांगितले.
तर स्त्रीरोग ऑन्कोसर्जन डॉ. स्वप्नील माने यांनी हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. कॉलेजच्या माध्यमातून विविध प्रकारचे आरोग्य शिबीर राबवले जातात. कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे त्यामुळे त्याविषयीची जागरूकता निर्माण करणे व वेळेत तपासणी करणे गरजेचं आहे असे नागरिकांना आवाहन केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि फिजिओथेरपीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.