पुणे | पुण्यातील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने सूर्यदत्त सूर्यभारत महोत्सव २०२३-२४ मध्ये प्रसिद्ध गायक पद्मश्री अनुप जलोटा यांच्या भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये जलोटा यांनी सादर केलेल्या भजनांनी रसिक प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते.
पद्मश्री अनुप जलोटा यांनी सादर केलेल्या भजन कार्यक्रमात त्यांना तबला वादक अमित चौबे, गिटार वादक हिमांशु तिवारी, किबोर्ड वादक प्रकाश सुतार, पार्श्वगायिका मनाली चतुर्वेदी, पार्श्वगायिका महाश्वेता बासू यांनी साथ दिली.
यानिमित्त प्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांनी भक्तिगीतांच्या बरोबरच देशभक्तीपर गाणी देखील सादर केली जावी.जेवढी प्रभुभक्ती हवी तेवढीच आपल्या मनात देशभक्तीदेखील हवी असा संदेश दिला.
तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी चोरडिया यांनीदेखील या कार्यक्रमाविषयी बोलताना हा कार्यक्रम जीवनाचा अर्थ सांगणारा होता, जीवन जगण्याची व्याख्या काय हे आजच्या कार्यक्रमातून समजले अशी भावना व्यक्त केली.
यावेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी चोरडिया यांच्या हस्ते पद्मश्री अनुप जलोटा यांना सूर्यदत्त सूर्यभारत पुरस्कार देऊन तर उपस्थित मान्यवरांनाही सन्मानित करण्यात आलं.
याबरोबरच यावर्षीच्या नॅटक़न 2023 स्पर्धेत विशेष कामगिरी केलेले सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थी निलेश पाटील, बजरंग मोरे, लक्ष्मीकांत कलाने, गोवर्धन आडे, सौरभ जोशी, ओम अभ्यंकर, पार्थ कुमार, कौशल होवल, अंकित महिलांगे, वेदांत पाटील आणि अपूर्वा पाटील यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक किशन शर्मा यांनी केलं…
या कार्यक्रमास अ.भा.मराठी नाट्यसंमेलनाच्या उपाध्यक्षा शोभा कुलकर्णी, विश्व हिंदू परिषद कानपूरचे जिल्हा संरक्षक कैलास नारायण दीक्षित, नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (एनआयपीएम) पुणेचे चेअरमन कल्याण पवार, सचिव डॉ. अजित ठाकूर, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, किशोर केंचे, ऍड. प्रशांत क्षीरसागर, पवन शर्मा यांच्यासह संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.