मुंबई | महाराष्ट्रात काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. हांडोरे यांचा २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळं विधान परिषदेला पराभूत झालेल्या उमेदवारालाच पुन्हा राज्यसभेची उमेदवारी का यावरून काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्याचसंदर्भात आपण खालील व्हिडीओतून जाणून घेऊया…
हंडोरे विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात होते. १९९२ ते १९९३ या कालावधीत ते मुंबईचे महापौर होते. हंडोरे हे आंबेडकरवादी आणि सामाजिक-राजकीय संघटना “भीम शक्ती”चे संस्थापक अध्यक्ष आहेत. दलित चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. विधान परिषदेत त्यांचा पराभव झाल्यामुळे दलित समाजात नाराजी होती. ही नाराजी दूर करण्यासाठी आता काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे.