राज्यात मिशन 45 हे उद्दिष्ट ठेवून वाटचाल करणाऱ्या भाजपानं बारामती मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.शरद पवारांचा अभेद्य गड आणि होमपीच असलेली बारामती काबीज करण्यासाठी भाजपकडून मोठी रणनीती आखली जात आहे. राष्ट्रवादी फुटीमुळे याचा फायदा देखील भाजपाला होऊ शकतो. राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंविरुद्ध कोण लढणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपासून सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. अशातच आता सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनर्स झळकल्याने त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय.त्यामुळं बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगू शकतो का ? या व्हिडिओतून जाणून घेऊयात…
बारामती भावनेच्या पाठीशी उभे राहती की विकासाच्या मागे उभी राहते.असंही त्यांनी म्हटलं आहे. या सगळ्य्यात भाजपला असं वाटतं की बारामतीत ताकद लावली तर ही सीट त्यांना मिळू शकते. सुप्रिया सुळे यांना मदत करणारे बऱ्याबैकी नेते भाजपच्याबाजूने आले आहे. पवारांचं राजकारण संपवायचं असेल तर थेट बारामतीतच त्यांचा पराभव करणं हे लक्ष्य असू शकतं. त्यामुळं बारामतीत शरद पवारांच्या घरातूनच उमेदवार देण्याचा मनसुभा आता सफल होताना दिसणार आहे. सुप्रिया सुळे विरुध्द सुनेत्रा पवार असा नणंद विरुद्ध भावजय संघर्ष अटळ असल्याचं सध्याचं चित्र आहे..