काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी, माजी खासदार मिलिंद देवरा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यांनी अजित पवार गट, शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. असे बडे नेते भाजापत जात असताना अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. जयंत पाटील भाजपात जाणार हि चर्चा गेल्या एक ते दिड वर्षापासून या ना त्या कारणाने होत आहे.. आता पुन्हा एकदा या चर्चेने जोर धरला आहे.. त्यामुळं खरंच जयंत पाटील भाजपात जातील या शक्यतेमागची काय कारणं असू शकतात.. या व्हिडिओतून जाणून घेऊयात…
अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात अनेकदा खटके उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं पाटील हे अजित पवार यांच्या हाताखाली किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं पसंत करतील असं वाटतं नाही.. आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांनाही पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातही अनेक नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत असं भाजपच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे.. अशात जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा जोर धरतायेत. आता या सगळ्या चर्चांवर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे कि मी कुठेही जाणार नाही, मला भाजपकडून कोणतीही ऑफर नाही. कोणत्याही भाजप नेत्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही. अलीकडच्या काळात दिल्लीत गेलोच नाही त्यामुळे बैठक होण्याचा प्रश्नच नाही. आमची सुप्रीम कोर्टात केस होती तेव्हा गेलो होतो त्यानंतर नाही गेलो त्यामुळे कोणतीही बैठक झाली नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे…असं असलं तरी आता पर्यंत घडलेलया घडामोडी पाहता जयंत पाटील भाजपात जाणार नाही हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही..