शिक्षण घ्याव आणि आरामात नोकरी करावी असा एक ढोबळ विचार आपल्यापैकी अनेकांमध्ये असतो. परंतु, अहाना गौतम ही त्याला अपवाद ठरलीय. कोण आहे ही अहाना गौतम आणि तिने १०० कोटींची कंपनी कशी उभारली. यासंदर्भातील तिची ही सक्सेस स्टोरी नक्की पहा…30 वर्षीय अहाना गौतम ही मूळची राजस्थानच्या भरतपूरची आहे… 2010 मध्ये तिने आयआयटी मुंबईमधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केलं. पुढे हॉर्वर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली. यानंतर तिने अमेरिकेतील प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनीमध्ये काम केलं. नोकरी करीत असताना तिला व्यवसायाची आयडीया सुचली. तर झालं असं की… जंक फूड खाऊन अहानाचं खूप वजन वाढलं….अमेरिकेत तिला हेल्दी स्नॅक्स मिळणं फार दुर्मिळ झालेलं.. याचदरम्यान ती एका हेल्दी फूड स्टोअरमध्ये गेली… जिथं तिला निरोगी अन्नाची गरज असल्याचं लक्षात आलं.. आणि इथूनच अहानाला ओपन स्नॅक्सची कल्पना सुचली. आणि ती मायदेशी परतली… आपल्या आईला सोबत घेऊन तिनं कंपनी सुरू करायचं ठरवलं. आईने अहानाच्या जिद्दीवर, आत्मविश्वासावर आणि तिच्या स्वप्नांवर विश्वास ठेवून आर्थिक साहाय्य केलं…
अहानाने दाखवून दिलं दाखवलं आहे की भारतीय स्टार्टअप्समध्ये जागतिक स्तरावर स्वतःच नाव कमावण्याची क्षमता आहे. 3 वर्षांत तिने आपल्या कंपनीचं मूल्यांकन 100 कोटींवर नेलं. एका छोट्या कल्पनेतून तिने मोठा उद्योग उभा केला. कोणत्याही नवीन ब्रँडसाठी बाजारपेठेच्या सध्याच्या गर्दीत स्वतःच स्थान निर्माण करणं सोपं काम नाही. मात्र आज अहाना गौतमच्या नावाचा ‘फोर्ब्स इंडिया अंडर 30’ मध्ये समावेश आहे. या व्यवसायातही नाविन्य आणण्याचा ती सातत्यानं प्रयत्न करत असते…