मुंबई | आज शिवतीर्थवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमागचं कारण म्हणजे येत्या 17 मे रोजी शिवाजी पार्क मैदानात महायुतीची भव्य सभा होणार आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत त्यामुळे राज ठाकरे यांनीही या सभेला उपस्थित राहावं यासाठी बावनकुळे यांनी ठाकरेंची भेट घेतलीय.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती देताना, राज ठाकरे यांनी महायुतीच्या सभेच निमंत्रण स्वीकारल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात मतदानाचे आतापर्यंत चार टप्पे पार पडले आहेत त्यात राज ठाकरे यांचा महत्त्वाचा वाटा होता. मुंबईत आल्यावर त्यांचे आभार मानणं आवश्यक होतं असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
आता येणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या टप्यात मुंबई आणि नाशिकमध्ये निवडणुक पार पडणार आहे. त्यामध्ये राज ठाकरे यांची महत्त्वाची भूमिका राहील. त्यांनी पुण्यातही आवाहन केलं त्याचा महायुतीला फायदा झाला असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे महायुतीला बळ मिळालं. पुढच्या काळातही महायुतीला बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाजपाला 200 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही, या दाव्याविषयी बोलताना, काँग्रेस पक्ष 240 जागांवर लढतोय, ते पंतप्रधानपदाचा विचार कसा करु शकतात. काँग्रेस विरोधी पक्षनेता बसवण्याच्या स्थितीत सुद्धा राहणार नाही असा दावा बावनकुळेंनी केला.