नगरसेवक म्हणून चार टर्म ज्यांनी काम केलं. २०१७ मध्ये पुणे महापालिकेत एकहाती सत्ता येताच स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सलग अडीच वर्षे ज्यांना संधी दिली गेली आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होताच लगेच पुणे शहराच्या महापौर पदी जे विराजमान झाले त्या मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभा मतदार संघाचे तिकीट देण्यात आलं आणि पहिल्यांदाच खासदार झालेल्या मोहोळ यांना केंद्रात मोदी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळालं.पुण्याला 1995-96 नंतर पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाल्याने पुणेकरांना त्याचा आनंद झालाय.या गोष्टीचा अनेकजण वेगवेगळ्या अंगांनी विचार करून अर्थ काढतायत. आणि त्याची मांडणी करीत आहेत. परंतु, खरंच मोहोळ यांना राज्यमंत्रीपद मिळणं हे इतकं सरळ सोप्पं असेल का? की यामागे भाजपाचा मास्टर प्लान असेल..? मुरलीधर मोहोळ यांची 2017 पासूनची वाटचाल बघितली तर, गेल्या ८ वर्षांत महत्वाच्या पदावर मोहोळ यांना संधी कशी देण्यात आली.त्यांच्याकडं सहकार विभाग का दिला असेल.आणि त्यामागे भाजपचा काय मास्टर प्लॅन असू शकतो याविषयीचा अंदाज आपल्याला येतो. याच संबंधी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत.