लोकसभा निवडणुकी दरम्यान अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महायुतीत उमेदवार निश्चित झाले नव्हते. त्याचा फटका निवडणुकीत महायुतीमधील तिन्ही पक्षांना बसला. त्या निकालापासून धडा घेत महायुतीने विधानसभेसाठी जागा वाटपावर चर्चा सुरु केली आहे. या प्राथमिक चर्चेनुसार, भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किती जागा दिल्या जाणार? महायुती जागा वाटपाचं गणित कसं जुळणार? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ..
महाराष्ट्रातील भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये गेलं होतं. त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक ‘सागर’ बंगल्यावर पार पडली होती. या बैठकीत भाजप १६० ते १७० जागा लढवणार यावर चर्चा झाली. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद कुठे आहे, या घटकपक्षांना किती जागा सोडल्या जाणार यावर चर्चा करण्यात आली.लोकसभा निवडणूक संपल्यानंतर भाजपने राज्यात एक सर्वेक्षण केलं होतं.त्या अहवालातून समोर आलेल्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.गेल्या वेळी भाजपचे १०५ आमदार निवडून आले होते त्या जागांची आता काय स्थिती आहे.तिथलं राजकीय समीकरण कसं आहे.ते आमदार पुन्हा निवडून येऊ शकतात का ? कुठे फटका बसू शकतो या मुद्यांवर देखील चर्चा केली.या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या.त्यांची ताकद कोणत्या ठिकाणी आहे त्यानुसार जागा द्यायच्या याबाबत देखील खलबतं झाली.प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे तर मुंबई तसेच मराठवाडा या भागांतल्या जागांवरती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचा दावा आहे…त्यामुळे भाजपने देखील या बैठकीत मित्रपक्षांना कुठे जागा सोडता येतील, कोणत्या जागा ते लढू शकतात यावर चर्चा केली.
लोकसभा निवडणुकीत जिल्हा वार भाजपची कामगिरी कशी झाली.ज्या ९ जागा जिंकल्या तिथं कामगिरी कशी राहिली आणि ज्या जागांवर पराभव झाला त्याठिकाणी भाजपला किती मतं मिळाली या संघटनात्मक पातळीवर आणि लोकसभेला मिळालेल्या मतांच्या आकडेवारीनुसार बैठकीत चर्चा झाली.. यात महत्वाचं म्हणजे लोकसभा आम्ही एकत्र लढलो तसंच विधानसभा देखील मित्रपक्षांना सोबत घेऊनच एकत्र लढू असं एक मत भाजपच्या नेत्यांनी बैठकीत मांडलं.याचबरोबर लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदार संघनिहाय किती मतं मिळाली हे सुद्धा विचारात घेतलं आहे.यासह संबंधित मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदारांसह इतर काही प्रभावी इच्छुक चेहरे आहेत का याची देखील यादी मागवली आहे.त्याचबरोबर जागावाटपाबाबत जी चर्चा झाली त्यात भाजप १६० ते १७० जागा लढवेल असं काही भाजप नेत्यांचं मत होतं.पण याबाबत जो निर्णय होईल तो दिल्लीत पाठवला जाईल आणि दिल्लीत अंतिम निर्णय होईल असं ठरल्याची माहिती आहे.यासह या बैठकीत आणखी एक मुद्दा मांडण्यात आला तो म्हणजे आपल्या पक्षाच्या निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी करण्यात आली. आता महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या घटक पक्षांना किती जागा मिळू शकतात.तर शिंदेंच्या शिवसेनेला ६०-६५ जागा मिळू शकतात.आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी ५०-५५ जागा सोडण्याचा विचार सुरु आहे.यासह लोकसभा निवडणुकीतील निकालाने धास्तावलेली महायुती आता विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांसाठी देखील जागा सोडणार आहे. छोट्या पक्षांसाठी सुमारे १५ जागा सोडण्याबाबत विचार सुरू आहे.