नुकतीच 12 जुलै रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे 5, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे प्रत्येकी 1 आमदार निवडूण आले. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पुरस्कृत शेकापचे जयंत पाचील यांचा पराभव झाला. यावेळी महायुतीकडे पुरेसं संख्याबळ नसताना त्यांचे 9 उमेदवार निवडूण आले आणि महाविकासआघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला यामुळं चर्चांना चांगलंच उधाणं आलं आहे. यावेळी महाविकासआघआडीतील अनेक आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचंही स्पष्ट झालं आहे. अशा परिस्थितीत आता काँग्रेसच्या 7 ते 8 आमदारांना क्रॉस वोटिंग केला असल्याचा दावा करण्यात येतोय. या काँग्रसेच्या 7 आमदारांची नावं देखील आता सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सात ते आठ आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं समोर आलं आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसकडे 37 आमदारांचे संख्याबळ होतं. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी विजयाचा उंबरठा ओलंडल्यानंतरही काँग्रेसकडे 13 ते 14 आमदारांची संख्या शिल्लक राहणं अपेक्षित होतं. ही अधिकची मते सहाजिकपणे महाविकासआघाडीतील इतर उमेदवारांकडे वर्ग होणं गरजेचं होतं. मात्र, या निवडणुकीत असं न झाल्यानं मविआच्या जयंत पाटलांचा पराभव झाल्याचं समोर आलं आहे.
- काँग्रेसच्या ‘या’ 7 आमदारांनी केलं क्रॉस वोटिंग
1) झिशान सिद्दिकी– काँग्रेसचे वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीला मतदान केल्याचं सांगितलं जातंय. झिशान सिद्दिकी यांचे वडिल बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळेच झिशान सिद्दिकींनी महायुतीला मतदान केलं असल्याचे निष्कर्ष बांधले जात आहेत.
2) सुलभा खोडके– काँग्रेसच्या अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनीही या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचे आरोप करण्यात येत आहेत. सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. सुलभा खोडके यादेखील 2019पूर्वी राष्ट्रवादी काँग्रसमध्ये होत्या. त्यामुळेच त्यांनी यंदा महायुतीनं अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने मतदान केल्याचं बोललं जातंय.
3) शिरीश चौधरी– काँग्रेसचे जळगावचे आमदार शिरीश चौधरी यांनीही या निवडणुकीत महायुतीला तदान केल्याचं सांगितलं जातंय. शिरीश चौधरी हे जळगावातील काँग्रेसचे प्रमुख आमदार आहेत. मात्र, विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिरीश चौधरींचं मतंही फुटल्याचं समोर आलं आहे.
4) हिरामण खोसकर- काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनीही या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केलं असल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. हिरामण खोसकर यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळचे संबंध असल्याचं वारंवार सांगितलं जातं. यातूनच आता हिरामण खोसकरांचं मच फुटलं असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
5) जितेश अंतापूरकर– देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदाम जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अशोक चव्हाणांनी भआजपमध्ये प्रवेश त्यावेळी काँग्रेसचे जितेश अंतापूरकरदेखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. मात्र, त्यावेळी जितेश अंतापूरकर हे काँग्रेससोबत राहिले. मात्र, विधानपरिषदेच्या निवडणुकीत जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसच्या विरोधात णतदान केलं असल्याचं बोललं जातंय.
6) कैलास गोरंट्याल– विधानपरिषदेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे जालना विधानसभेचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आमची 4 ते 5 मतं फुटतील असा दावा केला होता. त्यानंतर आता स्वतः कैलास गोरंट्याल यांनीही महायुतीला मतदान केलं असल्याची शक्यता आहे. कैलास गोरंट्याल हे देखील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
7) मोहन हंबर्डे– नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे हे देखील अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. विधानपरिषदेच्या निवडणुकीत मोहन हंबिर्डे यांनी देखील णहायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याची माहिती सध्या सुत्रांच्या हवाल्याने समोर आलं आहे.
याशिवायही महाविकासआघाडीतील अनेक आमदारांनी यंदाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता विरोधात मतदान करणाऱ्या या आमदारांवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.