लोकसभा निवडणुकीवेळी जागावाटपावरून महायुतीत वादाच्या ठिणग्या उडाल्या होत्या. अनेक जागांचा तिढा सुटता सुटत नव्हता. नाराजी, बंडखोरी, धुसफूस, आरोप-प्रत्यारोप असं बरंच काही त्यावेळी आपल्याला पाहायला मिळालं. आता अवघ्या तीन महिन्यावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. लोकसभेला झालेल्या चुका टाळून प्रत्येक पक्षाची आतापासूनच जोरदार तयारी सुरु आहे. अनेक जागांवर त्या त्या पक्षाकडून अप्रत्यक्षपणे उमेदवार जाहीर केले जात आहेत. पण जसं लोकसभेला घडलं तसंच विधानसभा निवडणुकीवेळी देखील पाहायला मिळू शकतं. उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची चांगलीच दमछाक होणार असल्याचं चित्र निर्माण होऊ लागलंय. राज्यातील असे काही विधानसभा मतदार संघ आहेत जिथं शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. नुसती तयारीच नाही तर दोन्ही पक्षाचे नेते आणि इच्छुक उमेदवार आतापासून मतदार संघावर आपलाच दावा असल्याचं सांगू लागलेत. राज्यातील या विधानसभा मतदारसंघात शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून वाद होऊ शकतात. प्रथमदर्शनी असे नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत जिथं ही स्थिती निर्माण झालीय. याठिकाणी तिढा सोडवणं शिवसेना आणि भाजपसाठी मोठं डोकेदुखीचं काम ठरू शकतं. ते विधानसभा मतदारसंघ नेमके कोणते ? हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत…
हे नऊ विधानसभा मतदारसंघ असे आहेत. जिथं शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची जागा वाटपावेळी मोठी दमछाक होऊ शकते. यासह असे आणखी मतदारसंघ देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात जिथं दोन्ही पक्षात मोठी रस्सीखेच पाहायला मिळेल.