आगामी विधानसभा निवडणूक हि अगदी एक ते दीड महिन्यावर येऊन ठेपली आहे. अशातच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात जागावाटपावरून सतत बैठका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षात म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये मुंबई मधल्या ३६ विधानसभा मतदारसंघातील जागावाटप झाल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून तिढा पहिला मिळत होता परंतु आता मुंबई मधल्या ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 20, काँग्रेस 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 7 जागांवर आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. आता महाविकास आघाडीमधलया या तीन घटक पक्षांनी कोणत्या कोणत्या जागांवर दावा केलायं ते बघुयात..
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईमधल्या ३६ पैकी २० जागांवर दावा केलेले मतदारसंघ पुढील प्रमाणे:- शिवडी, भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर, भांडुप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, दहिसर, वडाळा, घाटकोपर पश्चिम, गोरेगाव, अणुशक्ती नगर आणि वर्सोवा.
तर काँग्रेस पक्षाने मुंबईमधल्या ३६ पैकी 18 जागांवर दावा केलेले मतदारसंघ पुढील प्रमाणे:- धारावी ,चांदिवली ,मुंबादेवी ,मालाड पश्चिम ,सायन कोळीवाडा ,कुलाबा ,कांदिवली पूर्व, अंधेरी पश्चिम, वर्सोवा, वांद्रे पश्चिम, घाटकोपर पश्चिम, कुर्ला, भायखळा, जोगेश्वरी पूर्व, मलबार हील, माहीम, बोरीवली आणि चारकोप विधानसभा मतदारसंघ.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 7 जागांवर दावा केलेले मतदारसंघ पुढील प्रमाणे:- अणुशक्ती नगर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, वर्सोवा, कुर्ला, अंधेरी पश्चिम आणि दहिसर विधानसभा मतदारसंघ. तर महाविकास आघाडीमध्ये मित्र पक्ष असलेल्या समाजवादी मित्र पक्षाने शिवाजीनगर मानखुर्द या मतदारसंघावर आपला दावा सांगितल्याचं बोललं जात आहे.
आपण बघितलं तर मुंबई मधल्या काही मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता अधिक आहे. आता ते मतदारसंघ कोणते कोणते आहेत ते पाहुयात.. भायखळा, कुर्ला, घाटकोपर पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व आणि माहीम या सहा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत रस्सीखेच अटळ दिसत आहे.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असताना मुंबई मध्ये काँग्रेसने २९ जागा लढवल्या होत्या त्यापैकी फक्त चारचं जागांवरती काँग्रेसला विजय मिळवता आला तर राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागा लढवल्या त्यापैकी फक्त एकाचं जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले तर समाजवादी पक्षाने १ जागा लढवून त्या जागेवर विजय देखील मिळवला. तर शिवसेनेने १९ जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी १४ जागांवर विजय देखील मिळवला होता. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतल्या ३६ पैकी किती मतदारसंघावर महाविकास आघाडी बाजी मारणार हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होईलच..