शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालयाचं तारीख पे तारीख चं सत्र सुरू आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आता 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. तर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर देखील 21 ऑक्टोबरला सुनावणी होईल. दिवाळीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. साधारणपणे 45 दिवस आचारसंहिता लागते. म्हणजे सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू शकते. गेल्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी निकालाचे संकेत दिले होते. पण आता पुन्हा तारीख पुढं ढकलण्यात आलीय. विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. दोन्ही पक्षांचे खटले चंद्रचूड यांच्यासमोर आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड निवृत्त होण्यापूर्वी ही दोन प्रकरणं निकाली काढतील का? याप्रकरणी राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी निकाल लागणार का? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..