पुणे। दि पूना मर्चेंटस् चेंबरच्या सभासदांच्या अद्ययावत नवीन टेलीफोन डायरीचा प्रकाशन सोहळा दि पूना मर्चटस् चेंबर येथे शनिवार दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झाला. या प्रसंगी जीतो अपेक्स अंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विजय भंडारी यांनी सध्याच्या डिजीटल काळातसुध्दा व्यवसायातील संपर्क करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती सदर डायरीमध्ये असल्याने याची उपयुक्तता असल्याबद्दल सांगितले. तसेच यात चेंबरच्या सभासदांचे फोन नंबर, ईमेल इत्यादी माहिती आहेच पण इतरही उपयुक्त माहिती संग्रहीत केलेली आहे, असे कौतुकास्पद उद्गार डायरीच्या प्रकाशन प्रसंगी विजय भंडारी यांनी काढले.
संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी असलेल्या अत्यंत उपयुक्त अशा या डायरीमध्ये चेंबरच्या सभासद फर्मचे नांव, पत्ता, दूरध्वनी व मोबाईल नंबर त्यांच्या ई-मेल, वेबसाईट, व्हॉटस्अप क्रमांक व्यवसायाचा प्रकार तसेच यावर्षी प्रथमच सभासदांचे जीएसटी क्रमांक व अन्न औषध प्रशासन परवाना क्रमांक देण्यात आले आहेत.या बरोबरच पूना किराणा भुसार दलाल असोसिएशन, पुणे मोटार गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशन्स्, पुणे श्रमिक पत्रकार संघ यांचे सभासदांसह पुण्यातील विविध व्यवसायिकांच्या असोसिएशन, बँका, हॉस्पिटल, ब्लडबँकएस. टी.एअरलाईन्स, प्रवासी संघटना, रेल्वे वेळापत्रक, अत्यावश्यक सेवा, पुणे शहराचे पिनकोड क्रमांक, शासनाच्या महत्वाच्या वेबसाईटस्, नाव, पत्ते, शॉप अॅक्ट, पार्टनरशिप फर्म, पासपोर्ट, पॅनकार्ड, फुड लायसेन्स, व रजिस्ट्रार ऑफ कंपनी इ. करिता लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची यादी व इतर उपयुक्त माहितीची यादी फोन नंबरसह देण्यात आली आहे.
तसेच सदर डायरीमध्ये केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र राज्याचे मंत्री यांचे व खासदार, आमदार, नगरसेवक व व्यवसायाशी संबंधित विविध सरकारी खात्यासह महत्वाचे व उपयुक्त फोन नंबरही देण्यात आलेले आहेत. चेंबरच्या डायरीला महाराष्ट्रातील संपूर्ण व्यापारी व व्यावसायिक संस्थाकडून विशेष मागणी होत असते, असे चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी सांगितले. याप्रसंगी व्यवसायिकांची शिखर संस्था असलेल्या जितोच्या चेंबरचे सभासद असलेल्या नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. जितो अॅपेक्सचे अंतराष्ट्रीय व राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष इंदर छाजेड, राजेश सांकला, उपाध्यक्ष रवि सांकला, चेतन भंडारी, जितो युथ विंगचे चेअरमन गौरव बाठिया, जितो पुणे चॅप्टरचे संचालक प्रविण चोरबेले, मुकेश छाजेड, कुणाल ओस्तवाल व आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी चेंबरचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष अजित सेटिया, जेष्ठ सदस्य जवाहरलाल बोथरा, कार्यकारी मंडळाचे सर्व संचालक, सभासद व दलाल बंधू उपस्थित होते. या कार्यक्रमाची माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी प्रस्तावना केली. ईश्वर नहार यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय व सुत्रसंचालन उत्तम बाठिया यांनी केले तर आभार आशिष दुगड यांनी मानले.