राज्यात विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राजकीय हालचालींना मोठा वेग आलेला पाहायला मिळत आहे.राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याच कारणामुळे राज्याच्या राजकीय पातळीवर देखील मोठ्या घडामोडी घडत आहेत. जवळजवळ सर्वच पक्षांतील आजी-माजी आमदारांची तिकीट मिळवण्यासाठी धडपड चालू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राज्यात राजकीय चर्चांना आता उधाण आलाय. त्यामुळे हा अजित पवारांना एक मोठा धक्का असल्याचं बोललं जातंय.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे महायुतीला चांगलेच धक्के देताना दिसत आहेत. सोलापूरच्या माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे व काही नगरसेवकांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माढा विधानसभा मतदारसंघाची समीकरण बदलणार असल्याचं चित्र दिसत आहे. त्याचबरोबर, भोसरीचे माजी आमदार व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी ही सकाळी शरद पवारांची भेट घेतल्याने ते शरद पवार गटात येणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे एक प्रकारे हा अजित पवारांना मोठा धक्का मानला जातोय. त्यानंतर आष्टी पाटोदा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा प्रमुख राम खाडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्याविरोधात रिंगणात उतरणार आहेत. व अकोले मतदारसंघाचे युवा नेते अमित भांगरे हे अकोला विधानसभेतून राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या विरोधात निवडणूक लढवणर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने ते पुन्हा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकारणात मोठे बदल होणं असल्याचे संकेत दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधीच शरद पवारांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात शरद पवार अनेक युवकांना ही मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.