रत्नागिरी | मातोश्रीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर घाणेरड राजकारण होत आहे. ते ५० खोक्याला बळी पडले नाहीत म्हणून त्यांची चौकशी केली जातीये असा आरोप रत्नागिरी सिधुदुर्गाचे खासदार विनायक राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या शिंदे गटावर केला आहे.
वैभव नाईक, राजन साळवी हे मातोश्रीचे प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. निष्ठा, श्रद्धा जपून ते खालेल्या मिठाला जागले आहेत. म्हणून कोणत्या ना कोणत्या एजन्सीचा दबाव टाकायचा. २००२ पासूनचे व्यवहार तपासायचे, कटकारस्थान करायचे हे अत्यंत घाणेरडे राजकारण आहे, असे मत राऊतांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.
तुम्ही कितीही एसीबी लावा,एलसीबी लावा,सीबीआय लावा नाहीतर ईडी लावा वैभव नाईक आणि राजन साळवी त्यांच्या दबावाला बळी पडणार नाहीत. असेदेखील राऊत म्हणाले.
दरम्यान , एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना अशा दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद पाहायला मिळत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. दसरा मेळावा झाल्यानंतर देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांविरुद्ध हल्लाबोल केला जातोय.