मुंबई | मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, पुढील तीन दिवस रुग्णालयात उपचार घेतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.
२ नोव्हेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.रुग्णालयात दाखल होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र डॉक्टरांनी सल्ला देताच शरद पवार यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, त्यांच्या नियोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहे. तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये असेदेखील गर्जे यांनी एका पत्राद्वारे आवाहन केले आहे.