राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाण्यातल्या विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. याचप्रकरणी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावताच जितेंद्र आव्हाडांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.
जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता आव्हाडांचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, आव्हाडांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरु असतानाच जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह चित्रपटगृहात प्रवेश केला होता. त्यावेळी चित्रपटगृहात गोंधळ झाला. त्यावेळी कार्यकर्ते आणि प्रेक्षकांमध्ये राडा झाला. हेच प्रकरण आव्हाडांना भोवलं. विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद झाला. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.