मुंबई | भाजप आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लबोल केला आहे. त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही हे त्यांना वारंवार सांगाव लागतं जर हिंदुत्व सोडलं नसेल तर वारंवार सांगायची गरज का पडते असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे.
ज्या दिवशी उद्धव ठाकरे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या नादाला लागले तेव्हाच त्यांचं हिंदुत्व संपल, महाराष्ट्राच्या जनतेला काहीच समजत नाही असं समजून त्यांची दिशाभूल करणं योग्य नसल्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, सत्तेच्या कालखंडात सरकार म्हणून तुम्ही आमदार आणि मंत्र्यांना देखील भेटले नाही ही वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्र हे विसरला नाही. आजही जे उरले-सुरले आहेत, त्यांना सत्तेत असताना कधी भेटला होतात, सत्ता गेली तेव्हा कार्यकर्ते आठवले, सत्तेत असताना कोणत्या कार्यकर्त्यांचे भले केले आहे, याचा लेखा जोखा मांडणं आवश्यक असल्याचा सल्लाही कदम यांनी ठाकरेंना दिला आहे.