दिल्ली । भारत-ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा दुसरा सामना येत्या शुक्रवारी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला
जाणार आहे.या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसुन येत आहे.
ऑस्ट्रेलिया संघ तब्बल १० वर्षांनंतर कसोटी सामना खेळण्यासाठी दिल्लीत येत आहे. या सामन्याचा थरार इतका आहे की, स्टेडियमची सर्व तिकिटे आधीच विकली गेली आहेत. ४ कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियन संघ १-० ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले जाणे अपेक्षित आहे.
नागपूरमध्ये झालेल्या पाहिल्या सामन्यात कांगारुला भारतीय संघाच्या फिरकीची धडकी भरली होती. झालेही तसेच, भारताने एक डाव आणि १३२ धावांनी सामना जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. अश्यात आता ऑस्ट्रेलिया संघ एका दशका नंतर दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर कसा खेळतो? हे पाहण्यासारखे आहे.