पुणे । देवेंद्र फडणवीस यांनी ३ वर्षापूर्वी झालेल्या शपत विधीवर गौप्यस्पोट केला आहे. सकाळचा शपत विधी हा शरद पवार यांच्या म्हण्याने झाला होता. त्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले, यावरच आज पुण्यात भाजप,प्रदेशाध्यक्ष,चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना एक सूचक विधान केले आहे. देवेंद्रजी स्वतःची खुर्ची वाचवण्याकरता असत्य कथण करत नाहीत मी २९ वर्षा पासून भाजप मध्ये आहे. मला देवेंद्रजी ची पूर्ण खात्री आहे.
तसेच जे घडले असेल तेच त्यांनी सांगितले असणार.उलट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दगा झाला आहे”, अशी भूमिका मांडत बावनकुळे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.
“२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहर्यावर उद्धव ठाकरे यांनी आमदार निवडून आणले. त्यावेळी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे अनेक वेळा म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असणार आहेत. माझ्याकडे उद्धव ठाकरे यांच्या २० क्लिप आहे. ज्यामध्ये ते असे बोलले होते. त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी माध्यमांना दाखवावेत. उद्धव ठाकरे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे नुकसान झाले आहे. अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळें यांनी माध्यमांशी बोल्तांनी दिली.