पुणे | पूना क्लब लिमिटेडच्या वतीने आयोजित नवव्या पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज ग्रुप स्पर्धेतील नववा सामना व्हीएस टायगर्स आणि जॅग्वार्स यांच्यामध्ये झाला. व्हीएस टायगर्सने हा सामना केवळ पाच षटकांत एकही गडी न गमावता जिंकला. व्हीएस टायगर्सचा सलामी फलंदाज विक्रम काकडे यास सामनावीर किताबाने गौरवण्यात आले.
पूना क्लब क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जॅग्वार्स संघाने सहा षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात ४७ धावा केल्या. त्यांच्याकडून विनित परमार याने सर्वाधिक १७ धावा केल्या. जॅग्वार्स संघानी दिलेले ४७ धावांचे आव्हान व्हीएस टायगर्स संघाने केवळ पाच षटकांतच पूर्ण केले. व्हीएस टायगर्स संघाने ५१ धावा केल्या. आणि एकही गडी न गमावता हा सामना जिंकला.
व्हीएस टायगर्सचे सलामी फलंदाज तारीक परवानी याने १८ चेंडुत नाबाद २६ धावा केल्या तर, विक्रम काकडे याने १४ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. विक्रम काकडे याने फलंदाजीबरोबरच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना तीन झेल पकडले. विक्रमच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यास सामनावीर किताब देऊन गौरवण्यात आले.
धावफलक:
जॅग्वार्स संघ – (६ षटकांत) ५ बाद ४७ केल्या
(विनित परमार १७ धावास मनप्रीत उप्पल १३ धावा)
पराभूत विरुद्ध
व्हीएस टायगर्स संघ – (५ षटकांत) ५१ धावा
(तारिक परवानी नाबाद २६ धावा, विक्रम काकडे नाबाद २१ धावा)