मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची. राऊत हे सतत कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारताच राऊत थुंकल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठलीय.
यादरम्यान गद्दारांवर थुंकणं हा हिंदु संस्कृतीचा भाग आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. इतकेच नाही तर यासाठी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दाखला देखील दिला आहे. वीर सावरकरांचे ते भक्त आहेत. एकदा वीर सावरकरांना न्यायालयात आणलं होतं. सावरकरांनी पाहिलं की, त्यांची माहिती देणारा बेईमान त्या न्यायालयाच्या कोपऱ्यात उभा आहे.वीर सावरकर त्याच्याकडे बघून थुंकले त्याची इतिहासात नोंद आहे. त्यामुळे बेईमानांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती, हिंदूत्व याचा एक भाग आहे. संताप व्यक्त करणं आहे. पण मी कोणावरही थुंकलो नाही. माझ्या दाताचा त्रास होता म्हणून ती कृती झाली असेही राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं.
या प्रकरणावर आता अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकानं तारतम्य ठेवून वागावं असा सल्ला राऊतांना दिला होता. यावर बोलताना राऊतांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली. राऊत म्हणाले की, धरणामध्ये **** पेक्षा थुंकणं चांगलं. संयम तर राखला पाहिजे हे बरोबर आहे. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत, आम्ही पळालो नाही. आम्ही माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभे आहोत. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा किंवा संकटं येत आहेत म्हणून भाजपसोबत सूत जुळवण्याचा मनात विचार येत नाही असं उत्तर संजय राऊतांनी दिलं आहे. त्यावर पुन्हा त्यांनी बोलण्याने आमच्या अंगाला भोकं पडत नाही असे अजित पवार म्हटले आहे.